शेतकऱ्यांना सातबारा व फेरफारचा उतारा ऑनलाईन मिळावा या उद्देशाने शासनाने
कार्यवाही सुरू केली आहे. महा ई सेवा केंद्राव्दारे लवकरच या सेवेस प्रारंभ
होणार असून तसे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
ई गव्हर्नन्स कृती आराखडय़ांतर्गत राज्यात ११ हजार ८१८ महा ई सेवा केंद्रे
स्थापन करण्यात येणार असून त्यातील ३,६१५ केंद्रे प्रत्यक्षात अस्तित्वात
आली आहेत. ग्रामीण भागात १० हजार ४८३ केंद्रे तर शहरी भागात १३३६ केंद्रे
स्थापन करण्यात येणार आहेत.
नागरिकांना त्यांच्या घराजवळ शासकीय सेवा
उपलब्ध व्हाव्यात, यासाठी एकात्मिक पद्धतीने ही योजना कार्यान्वित करण्यात
आली आहे. ग्रामीण जनतेला माहिती तंत्रज्ञानावर आधारित सेवांचा लाभ मिळावा,
या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत सातबारा, फेरफार,
उत्पन्नाचा दाखला, निवासी आणि अधिवास प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकाचा दाखला,
राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, शेतमालाचे बाजारभाव आदी सेवांबरोबरच मोबाईल
रिचार्ज, संगणक, हार्डवेअर दुरुस्ती, पॅनकार्ड, व्यक्तिमत्त्व विकास
अभ्यासक्रम, बस तिकिटाचे बुकिंग, डीटीएच आदी सेवाही देण्यात येणार आहे.

s
ReplyDelete